समुद्रावर फिरायला गेल्यावर किनाऱ्यावर वाहात येणाऱ्या लाटा पाहणे किती सुखद वाटते. पण, समुद्रात या लाटा कशा निर्माण हाेतात, माहिती आहे का?
समुद्र काहीवेळा रूद्र तर काही वेळा शांत दिसताे. पण, तुम्हाला माहिती आहे का? समुद्रात दर मिनिटाला हजाराे लाटा उसळत असतात.
समुद्रात एवढ्या वेगाने वाहणाऱ्या लाटांचा जन्म कसा हाेताे? या मागे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यातून दर मिनिटाला हजाराे लाटा उसळतात.
समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे लाटा निर्माण हाेतात. पाण्याच्या पृष्ठभागावरून वाहणाऱ्या वाऱ्याची उर्जा पाण्याला पुढे ढकलते आणि लाटा उसळतात.
लहान, माेठ्या आणि त्सुनामी अशा तीन प्रकारच्या लाटा असतात. लहान लाटा समुद्र किनाऱ्याजवळ असतात.
समुद्रात वादळी वारे सुटतात तेव्हा माेठ्या लाटा समुद्रात निर्माण हाेतात. समुद्राचा तळ हलताे, तेव्हा त्सुनामीसारख्या महाकाय लाटा निर्माण हाेतात.
लाटांंमुळे उर्जा निर्माण हाेते. यामुळे लाटा समुद्र किनाऱ्यावर आपटल्यावर आवाज हाेताे, फेस निर्माण हाेताे, पाणी उसळी मारताना दिसते.
वादळ किंवा चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग प्रचंड असताे, त्यामुळे लाटा उंचीने माेठ्या असतात. समुद्र किनाऱ्याला धाेकादायक असतात.
चंद्राप्रमाणे समुद्रात भरती - ओहाेटी हाेत असते. भरतीच्या वेळी लाटा किनाऱ्यावर अधिक उंचीने आणि जाेराने उसळतात.
लाटांमुळे किनाऱ्या जवळच्या जीवांना अन्न, ऑक्सिजन मिळताे. त्यांच्या हालचालींना मदत हाेते. प्रचंड माेठ्या लाटांमुळे त्यांना धाेकाही निर्माण हाेताे.
लाटांमध्ये पाण्याचे कण पुढे सरकत नाही, ते गाेलाकार हालचाल करतात. आपण लाटा पाहताे ती म्हणजे उर्जा पुढे जात असते. ते पहायला खूप छान दिसते.