हिवाळ्यात अनेकांना केसगळतीची किंवा डोक्यात कोंडा होण्याची समस्या जाणवते.
हिवाळ्यात वातावरण बदल झाला की त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर आणि केसांवर होत असतो.
हिवाळ्यात अनेकांना केसगळतीची किंवा डोक्यात कोंडा होण्याची समस्या जाणवते. म्हणूनच, असे काही घरगुती हेअर मास्क पाहुयात ज्याने केसांच्या तक्रारी दूर होतील.
कढीपत्त्याची पेस्ट तयार करुन त्यात २ चमचे दही मिक्स करा. हा तयार पॅक केसांना व्यवस्थित लावा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवा. या पॅकमुळे केसांतील कोंडा कमी होतो.
कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट, आवळा पावडर आणि मेथी पावडर एकत्र मिक्स करा. या पेस्टमध्ये कांद्याचा रस अॅड करा. साधारणपणे ३० मिनिटे हा पॅक केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा.
कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये कडुलिंबाचं तेल मिक्स करुन हा पॅक केसांना लावा. यामुळे केस चमकदार होतील. तसंच कोंडा, केसगळती सुद्धा कमी होईल.