हिवाळ्यात खा साजूक तूप, अनेक समस्या होतील दूर

हिवाळ्यात साजूक तूप खाण्याचे फायदे

थंडीच्या दिवसात आपली पचनक्रिया मंदावली असते. त्यामुळे या दिवसांमध्ये पचायला हलके आणि सकस आहार घेणं गरजेचं आहे.

थंडीच्या दिवसात कोरड्या वातावरणामुळे आपली स्कीनदेखील ड्राय झाली असते. त्यामुळे आहारात तूप, दूध वा अन्य स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.

हिवाळ्यात शरीराला योग्य वंगण मिळावं, शरीरातील उष्णता वाढावी, पचनक्रिया सुरळीत व्हावी यासाठी आहारात साजूक तुपाचा समावेश करणं गरजेचं आहे.

साजूक तूप हे एक अत्यंत उपयुक्त आणि पारंपरिक सुपरफूड मानलं जातं. आयुर्वेदानुसार तुपामुळे शरीरातील वातदोष कमी होतो तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

साजूक तूप शक्यतो सकाळच्या वेळी खावं. यावेळी आपली पचनशक्ती अॅक्टीव्ह असते. सकाळी रिकाम्या पोटी मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि चयापचय क्रियेचा वेग देखील सुधारतो.

लहान मुलांसाठी १ ग्रॅम ते १.५ ग्रॅम तूप पुरेसे असते. प्रौढांसाठी १० ते १५ ग्रॅमपर्यंत तूप फायदेशीर मानले जाते. महिलांसाठी रोज सुमारे ५ ग्रॅम तूप घेणे पुरेसे आहे. 

हिवाळ्यात ओठांजवळील त्वचा काळवंडते? 

Click Here