हिवाळ्यात संत्री खाल्ल्यामुळे खोकला होतो असं म्हटलं जातं.
हिवाळ्यामध्ये बाजारपेठा अनेक विविध फळ आणि भाज्यांनी सजून जातात. यात खासकरुन संत्री, गाजर, आवळे या भाज्या, फळे मोठ्या प्रमाणावर दिसतात.
हिवाळ्यात संत्री खाल्ल्यामुळे खोकला होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवसांमध्ये फारसं कोणी संत्री खात नाही. परंतु, खरंच हिवाळ्यात संत्री खाल्ल्यावर सर्दी-खोकला होतो का?
संत्र्यांमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच, हिवाळ्यात संत्री किंवा केळ खाल्ल्यावर अजिबात खोकला, सर्दी होत नाही.
जर एखाद्या व्यक्तीला अॅलर्जी असेल किंवा थंड पदार्थ सहन होत नसतील तर त्यांनी संत्री खाल्ल्यावर नक्कीच खोकला होऊ शकतो. कारण, संत्री मुळात थंड प्रकृतीचं फळ आहे.
हिवाळ्यात संत्री खाल्ल्यामुळे व्हायरल इंफेक्शन, बॅक्टेरिअल इंफेक्शन दूर राहतात. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.