कांदे आणि बटाटे चुकूनही ठेवू नका एकत्र

कांदे-बटाटे एकत्र ठेवणं अत्यंत घातक आहे.

अनेकांच्या घरामध्ये कांदे-बटाटे हे सर्रास एकत्र ठेवले जातात. मात्र, कांदे-बटाटे एकत्र ठेवणं अत्यंत घातक आहे.

कांदे आणि बटाटे एकत्र ठेवल्यामुळे आरोग्यास हानिकारक असून त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

कांद्यामधून इथिलीन हा नैसर्गिक वायू उत्सर्जित होतो. ज्यामुळे फळे आणि भाज्या लवकर पिकतात.

बटाट्यांसोबत कांदे ठेवल्यामुळे बटाट्यांना लवकर कोंब फुटतात.आणि, बटाट्यांवर ओलावा वाढतो. परिणामी, जास्त ओलाव्यामुळे बटाटे अकाली कुजू लागतात.

जर बटाट्यांवर हिरवे डाग पडले तर ते सोलानाइन नावाच्या रसायनाची निर्मिती करते, यामुळे उलट्या आणि पोटदुखीसारख्या समस्या होऊ शकतात.

कुजलेल्या कांद्या किंवा बटाट्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.

इम्युनिटी बूस्टर 'ओली हळद'!

Click Here