झोपेतून उठल्यावर डोळे सूजतात? काकडीमुळे होईल समस्या दूर
काकडी बहुगुणी असून तिचे अनेक शारीरिक फायदे आहेत.
उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी प्रत्येकजण आवर्जुन आहारात काकडीचा समावेश करत असतो.
काकडी बहुगुणी असून तिचे अनेक शारीरिक फायदे आहेत. काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करण्याचे गुण असतात. त्यामुळे डाएट करणाऱ्यांनी आवर्जुन काकडी खावी.
पोटाशी संबंधित तक्रारी किंवा वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे काकडीचं सेवन करावं.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी काकडीचा तुकडा तोंडात धरावा. यामुळे तोंडातील दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया मरतात.
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'बी' असते. ज्यामध्ये व्हिटॅमिन बी-1, व्हिटॅमिन बी-5, व्हिटॅमिन बी-7 यांचा समावेश आहे.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काकडीचा रस लावावा. तसंच झोपेतून उठल्यावर तुमचे डोळे सूजत असतील तर त्यावरही काकडीचा रस गुणकारी ठरतो.