अनेकांना रात्रीचं जेवण झाल्यावर लगेचच झोपायची सवय असते.
निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला आणि आपल्या शरीराला एका वेळापत्रकाची गरज आहे. हे वेळापत्रक जर तुम्ही नीट पाळलं. तर, सगळ्या शारीरिक समस्या नक्कीच दूर होतील.
अनेकांना रात्रीचं जेवण झाल्यावर लगेचच झोपायची सवय असते.परंतु, असं केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
रात्रीचं जेवण झाल्यानंतर एका ठराविक वेळेनंतरच झोपायला जावं. यामुळे तुमचं अन्नपचन नीट होतं. तसंच अन्य समस्याही दूर होतात.
तज्ज्ञांच्या मते, रात्रीचं जेवण आणि झोप यांच्यामध्ये किमान २ ते ३ तासांचं अंतर असावं.
जेवण आणि झोप यांच्यात ३ तासांचं अंतर असेल तर पचनक्रिया सुधारते, गॅसेसचा त्रास कमी होतो, झोपेची गुणवत्ता वाढते. तसच यांसारखे अनेक फायदे शरीराला होतात.
रात्रीच्या जेवणात शक्यतो हलका आहार घ्यावा. यात सूप, खिचडी यांसारखे पदार्थ असावेत.
रोज आवळा खाल्ल्याने शरीराला होतात हे जबरदस्त फायदे