पाळीदरम्यान चेहऱ्यावर का येतात मुरूम?

अनेक मुलींना पाळी येण्याआधी, नंतर किंवा दरम्यान चेहऱ्यावर मुरूम येतात, पण कशामुळे येतात हे माहित आहे का? जाणून घेऊ!

पाळीच्या काळात शरीरात अनेक प्रकारचे हॉर्मोनल बदल होतात, पण लक्षणीय बदल दिसून येतो ते म्हणजे चेहऱ्यावरील मुरूम किंवा पुरळ!

पाळीदरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन या हॉर्मोन्सची पातळी कमी जास्त होते, त्याचा परिणाम त्वचेवर होतो. 

पाळीदरम्यान चेहरा अधिक तेलकट होतो, रंध्र मोकळी होतात त्यामुळे इन्फेक्शन होऊन मुरूम येतात. 

अनेक जणी या काळात मानसिक तणावात असतात त्यामुळेही चेहऱ्याच्या त्वचेवर त्याचा परिणाम म्हणून मुरूम येतात. 

पाळीच्या काळात चयापचय प्रक्रिया मंदावते, त्याच्यामुळेही त्वचेचे आरोग्य बिघडून मुरूम येतात. 

पाळीच्या काळात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे डिहायड्रेशन होऊन मुरूम येतात. 

पाळीच्या काळात उलट सुलट खाण्यामुळे, तेलकट, गोड, तिखट पदार्थांच्या सेवनामुळेही मुरूम येतात. 

त्यावर उपाय म्हणजे, या काळात पाणी भरपूर पिणे, वरचेवर चेहरा धुणे, मॉइश्चरायजर क्रीमचा वापर करणे. 

Click Here