जिम सोडल्यानंतर शरीरामध्ये अनेक बदल होतात. वजन वाढतं, शेप बिघडतो मात्र असं का....?
जिम सोडल्यानंतर शरीरामध्ये कॅलरी जळणे कमी होते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.
जिम बंद केल्यानंतर जर आहारात कोणताही बदल केला नाही, तर उरलेली कॅलरी चरबीच्या स्वरूपात साठू शकते.
मसल्स कमी झाल्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतो आणि शरीराची कॅलरी जाळण्याची क्षमता कमी होते.
जिम सोडल्यानंतर फिजिकल अॅक्टिव्हिटी न केल्यास, किंवा जंक फूड, गोड पदार्थ आणि जास्त कॅलरी असलेल्या गोष्टी खाल्ल्यास वजन वाढते.
काही लोकांमध्ये हे बदल काही आठवड्यांत दिसतात, तर काहींना महिन्याभर वा त्याहून जास्त वेळ लागू शकतो.
जिम बंद केल्यावर वजन वाढू नये म्हणून आहारात कॅलरी कमी घ्या आणि पौष्टिक अन्न निवडा.
याचबरोबर प्रोसेस्ड फूड, साखर आणि हाय-कॅलरी ड्रिंक टाळा.
जिम बंद केली तरी देखील चालणे, धावणे, सायकलिंग अशा प्रकारची फिजिकल अॅक्टिव्हिटी करत रहा.
भरपूर पाणी प्या, चांगली झोप घ्या आणि आरोग्यदायी जीवनशैली ठेवा.