विवाहसोहळ्यात सप्तपदी जितकी महत्त्वाची असतात. तितकंच महत्त्वाचं मंगलाष्टक आणि वरमाला घालण्याला असतं.
हिंदू पद्धतीमध्ये विवाहसोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच भारतात मोठ्या धुमधडाक्यात लग्नसोहळे केले जातात.
भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये अनेक विधी, कार्यक्रम असतात. जवळपास २ ते ३ दिवस हा लग्नसोहळा चालतो.
आता लग्नात एकमेकांना वरमाला म्हणजेच वधूवर एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार का घालतात ते समजून घेऊयात.
हिंदू धर्मात फूल हे पावित्र्य, सौंदर्य आणि सकारात्मकतेचं प्रतिक आहे.
एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याचा अर्थ म्हणजे परस्परांप्रती आदर, प्रेम समानता दर्शविणे.
एकमेकांच्या गळ्यात हार घालणं म्हणजे त्या दोघांनीही एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार केला आहे. आणि, पुढील आयुष्य ते एकमेकांना साथ देतील.