तुमची लहान मुलं चहा-कॉफी पितायेत? बघा डॉक्टर काय सांगतात

अनेकांच्या घरात लहान मुलांना चहा-बिस्कीट किंवा चहा-पोळी सर्रास खायला दिली जाते. 

आपल्याकडे जवळपास सगळ्याच घरांमध्ये सकाळची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने होते.

अनेकांच्या घरात मोठ्यांसोबतच लहान मुलांनादेखील चहा-बिस्कीट किंवा चहा-पोळी सर्रास खायला दिली जाते. 

लहान मुलांना चहा किंवा कॉफी दिल्यामुळे त्याचा परिणाम हा थेट त्यांच्या आरोग्यावर होतो.  म्हणूनच, मुलांनी चहा प्यायला तर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात ते पाहुयात.

डॉ. सैय्यद मुजाहिद हुसैन यांनी चहा पिण्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर कसा गंभीर परिणाम होतो हे व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

लहान मुलांनी चहाचं सेवन केलं तर त्याचा परिणाम हा मुलांच्या झोपेवर होतो. चहा किंवा कॉफीमध्ये कॅफीन असतं ज्यामुळे मुलांच्या झोपेची गुणवत्ता खराब होते.

चहामुळे मुलांना नीट झोप येत नाही. परिणामी, अपुरी झोप झाल्यामुळे मुलांच्या शारीरिक विकासात अडथळा निर्माण होतो. त्यांची रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते.

चहामध्ये टॅनिन असतं ज्यामुळे मुलांच्या शरीरात आयर्नची कमतरता निर्माण होते. इतकंच नाही तर यामुळे पुढे जाऊन मुलांना एनिमियादेखील होऊ शकतो.

चहामुळे मुलांची नव्हर्स सिस्टीमवर परिणाम होतो. ज्यामुळे मुलांचं  अभ्यासात मन न लागणे, चिडचिडेपणा निर्माण होणे या समस्या होतात.

क्रिसमसमध्ये लाल आणि हिरवा रंग का आहे महत्त्वाचा?

Click Here