मोड आलेली कडधान्ये म्हणजे प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक समृद्ध खजिना.
मोड आल्यामुळे कडधान्यातील प्रथिने पचायला सोपी होतात. सर्व जीवनसत्त्वांची अनेक पटीने वाढ होते.
मोड काढण्यापूर्वी १०० ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्त्व हे २ ते ६ मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर २ ते ५२ मिलिग्रॅमपर्यंत वाढू शकते.
मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात.
मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असतात.
सुकविलेले मोड थोड्या वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात, अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात.