पावसाळा सुरू होताच बाजारपेठांमध्ये ओल्या खजुराची आवक होते.
हे दररोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीरातील सूज, अशक्तपणा, थकवा कमी होतो. गरम पदार्थांसोबत खाल्ल्यास पचन सुलभ होते.
ओल्या खजुरातील नैसर्गिक साखर मेंदूसाठी इंधनासारखे काम करते. यात असलेले ग्लुकोज फ्रुक्टोज मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करतात.
ओल्या खजुरामध्ये आयर्न, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, बी-कॉम्प्लेक्स अशी अनेक पोषणद्रव्ये असतात. त्यामुळे हे खजूर रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
ओल्या खजुरात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक हाडांची घनता वाढवतात. तसेच सांधेदुखीपासून संरक्षण मिळते.
थकवा, दुर्बलता यावर त्वरित ऊर्जा देणारे खजूर हे फळ नैसर्गिक 'एनर्जी बूस्टर' ठरतेय.