स्त्रियांना निसर्गतः नटण्या मुरडण्याची हौस असते, अशातच दागिन्यांमध्ये चांदीचे लॉकेट गळ्यात घाला असे सुचवले जाते, पण का? वाचा!
पूर्वीच्या बायकांना भरजरी साडी त्यावर जाडजूड मंगळसूत्र, ठसठशीत दागिने असा पेहराव आवडत असे, मात्र आता तसे नाही!
बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार अलीकडच्या मुलींना आणि महिलांना नाजूक दागिने घालायला आवडतात, त्यात चांदीचे लॉकेट समाविष्ट करावे.
ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे लॉकेट गळ्यातल्या चैनमध्ये घालण्याचे अनेक शारीरिक, मानसिक लाभ आहेत, कोणते ते जाणून घेऊ.
चांदीचे दागिने केवळ ट्रेंड म्हणून नाही तर शरीराला अतिशय लाभदायी ठरतात.
चांदी हा चंद्राचे प्रतीक असणारा धातू आहे. चांदीचे लॉकेट घातल्याने शरीरातील सातही चक्र नियंत्रित होतात.
आयुष्यात सकारात्मक बदल हवे असतील तर चांदीचे लॉकेट घालायला सुरुवात करा.
मन शांत ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी चांदीचे लॉकेट फायदेशीर ठरते.
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांदीचे लॉकेट घालणे हा उत्तम उपाय मानला जातो.
तुम्हीसुद्धा चांदीचे लॉकेट गळ्यात घालणार असाल तर सोमवार किंवा शुक्रवारी ते घालण्यास सुरुवात करा.