काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती, जाणून घ्या आरोग्याला कसा होतो फायदा?
उन्हाळ्यात काकडी ही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
काकडीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. पण रात्री काकडी खाऊ नये असा सल्ला दिला जातो.
रात्री काकडी खाल्ल्याने पचनासंबंधीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
काकडी थंड असल्याने रात्री खाल्ल्यास सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता जास्त असते.
रात्री काकडी खाल्ल्याने झोपेत अडथळा येऊ शकतो. तसेच खाज, एलर्जी असा त्रास देखील होऊ शकतो.
सकाळी आणि दुपारी तुम्ही काकडी खाऊ शकता. ज्यामुळे दिवसभर फ्रेश राहता आणि तुमच्या शरीराला पोषक घटक मिळतात.