समुद्र किनाऱ्यावर मातीऐवजी कायम वाळूच का असते? असा कधी प्रश्न पडलाय?
समुद्र किनारा म्हटलं की, डोळ्यासमोर येतो ते म्हणजे सूर्यास्त,सुर्योदय, निळशार पाणी आणि पायाला स्पर्श करणारी वाळू. आपल्या सगळ्यांनाच ठावूक आहे की समुद्र किनारी कायम वाळूच पाहायला मिळते.
असा एकही समुद्र किनारा नाही जिथे वाळूऐवजी माती आहे. परंतु, समुद्र किनाऱ्यावर मातीऐवजी कायम वाळूच का असते? असा कधी प्रश्न पडलाय?. आज त्यामागचं कारण जाणून घेऊयात.
जमीन, डोंगर आणि किनाऱ्यानजीकचे मोठे खडक यांच्यावर ऋतुमानानुसार परिणाम होतात. ज्यात ऊन, पाऊस, वारा, थंडी या सगळ्यामुळे त्या खडकांचं विभाजन होतं आणि लहान लहान तुकडे तयार होतात.
नदीसोबत अनेक लहानमोठे दगड, खडे, मातीचा गाळ असं सगळं काही वाहून समुद्रात येतं. आणि, समुद्र हे सगळं बाहेर टाकत असतो जे त्याच्या किनाऱ्यावर जमा होतं.
समुद्राच्या पाण्यामुळे लहान झालेले खडक रोज घासले जातात. ज्यामुळे त्यांचे कोटदार कडे झिजतात आणि हे दगड गोलाकार वाळूच्या रुपात तयार होतात.
समुद्राचं पाणी सतत खळखळत असतं. त्यामुळे दगडांचे मोठे कण (वाळू) किनाऱ्यावर जमा होतात. तर, बारीक कण समुद्रासोबत वाहतात.
व्यायाम करायचा कंटाळा येतो? मग एकदा work outचे फायदे नक्की वाचा