उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते?

उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते.

उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते. जे अनेक कारणांमुळे होऊ शकते. याचे कारण काय जाणून घेऊया. 

उन्हाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे नाकातील आतला थर कोरडा पडतो. कोरडेपणामुळे जखमा होतात. ज्या फुटतात आणि रक्तस्त्राव होतो. 

नाकात बोटे घालणे, जबरदस्तीने नाक साफ करणे किंवा दुखापत झाल्यामुळे देखील नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो. 

कधीकधी ॲलर्जी, जास्त शिंका येणे, सर्दी किंवा रक्तवाहिन्यांचे नुकसान किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील नाकातून रक्तस्त्राव होतो. 

उन्हाळ्यात गरम पदार्थांचे सेवन कमीत कमी करा. यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. 

ही समस्या टाळण्यासाठी आपल्याला हायड्रेट राहाणे गरजेचे आहे. पाण्यासोबत आपल्याला नारळपाणी, ज्यूसचा प्यायला हवे. 

उन्हाळ्यात ताजी फळे, हिरव्या भाज्या, पाणीदार पदार्थ खा. यामुळे पोट थंड राहते, ज्यामुळे नाकाच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. 

त्यासाठी नाकात बोटे घालू नका. नाक जास्त स्वच्छ देखील करु नका. रखरखत्या उन्हात घराबाहेर देखील पडू नका. जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Click Here