मायग्रेनचा त्रास टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स
धावपळीचं जीवन, चुकीची आहारपद्धती यांमुळे अनेकजण मायग्रेनसारख्या समस्येने त्रस्त आहेत.
बऱ्याचदा थंडी वाढल्यावर किंवा हिवाळ्यात अनेकांच्या मायग्रेनच्या त्रासात वाढ होते. इतकंच नाही तर अनेकांना मायग्रेनचा अॅटॅकही येतो.
हिवाळ्यात तापमान अचानक थंड झाल्यामुळे शरीरातील नसा आकुंचन पावतात. ज्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच, हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास वाढतो.
मायग्रेनचा त्रास टाळायचा असेल तर थंडीच्या दिवसात डोकं आणि कान व्यवस्थित झाकून घ्या. तसंच निदान १५-२० मिनिटे उन्हात नक्की उभं रहा.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. तसंच एसी,थंडावा असणाऱ्या ठिकाणी जास्त जाऊ नका.
हलका व्यायाम किंवा मेडिटेशन करा. तसंच मायग्रेन ट्रिगर करणाऱ्या वस्तू, पदार्थांपासून दूर रहा.