हॉटेल्सच्या रुममध्ये घड्याळ का नसतं?

हॉटेलच्या रुममध्ये गरजेला लागणाऱ्या सगळ्या सुविधा असतात. परंतु, तिथे घड्याळ अजिबात नसतं. 

कुठेही बाहेरगावी फिरायला गेलो की तिथे राहण्यासाठी प्रत्येक जण हॉटेल्सचाच आसरा घेतात.

हॉटेल्सच्या रुम्स म्हणजे एकदम सुसज्ज, सगळ्या सुखसोईंनी परिपूर्ण असतात. परंतु, एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीये का?

हॉटेलच्या रुममध्ये गरजेला लागणाऱ्या सगळ्या सुविधा असतात. परंतु, तिथे घड्याळ अजिबात नसतं. विशेष म्हणजे हॉटेल रुममध्ये घड्याळ नसण्यामागे काही कारणं आहेत.

फिरायला आल्यावर लोकं हॉटेलमध्ये आराम करतात. रिलॅक्स होतात. पण जर त्यांच्यासमोर घड्याळ असेल तर त्यांचं लक्ष सतत घड्याळाकडे जात आणि ते स्ट्रेसमध्ये येऊ शकतात.

काही लोकांना अत्यंत शांतता हवी असते. परंतु, घड्याळाच्या येणाऱ्या टिकटिक आवाजामुळे ते त्रस्त होऊ शकतात. त्यामुळे सुद्धा हॉटेल रुममध्ये घड्याळ ठेवत नाहीत.

मॉडर्न हॉटेल्समध्ये इंटीरियर मिनिमलिस्ट आणि स्टाइलिश असतात. त्यामुळे अनेकदा ही घड्याळं घराच्या इंटेरिअरला मॅच करत नाहीत. त्यामुळे काही हॉटेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेचा वापर केला जातो.

घड्याळ लावल्यावर ते मेंटेनही करावं लागतं. वेळोवेळी त्याचे सेल बदला. त्याचा टाइम सेट करा. हे सगळं वेळ खर्ची करणारं काम असल्यामुळेदेखील हॉटेल्स रुममध्ये घड्याळ ठेवत नाहीत.

समुद्र किनाऱ्यावर मातीऐवजी वाळू का असते?

Click Here