अनेकजण असाच टाईमपास म्हणून किंवा रिलॅक्स होताना कडाकडा बोटे मोडतात. काहीजण एकेक बोट मोडतात.
यावेळी कट, कट असा आवाज येतो. तो का येतो? हाडावर हाड घासते का? की आणखी काही या आवाजामागे कारण असेल...
जेव्हा आपण बोटे वाकवतो किंवा ओढतो तेव्हा कट असा आवाज येतो. काही लोकांना बोटे मोडण्याची सवयच लागलेली असते.
बऱ्याच लोकांना वाटते की हा आवाज हाडांच्या आदळण्याने होते. तुम्हालाही तसेच वाटत असेल. पण तसे नाहीय.
अल्बर्टा विद्यापीठाने यावर संशोधन केले आहे. त्यातून त्यांनी बोटे मोडताना कट असा आवाज कशाचा येतो त्याचा शोध लावला आहे.
आपल्या बोटांच्या सांध्यामध्ये एक प्रकारचा द्रव असतो. याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात. वंगन म्हणून ते काम करते.
जेव्हा आपण बोटे ताणतो तेव्हा सांध्यातील जागा थोडी वाढते. त्यामुळे तेथील द्रवपदार्थातील दाब बदलतो.
दाबातील बदलामुळे त्या द्रवपदार्थात लहान वायूचे फुगे तयार होतात. हे फुगे अचानक फुटताच आवाज येतो.
हा आवाज प्रत्यक्षात त्या वायूचे फुगे फुटल्याचा असतो, हाडांचा नाही. आता अनेकदा बोटे मोडणे हानीकारक असल्याचेही म्हटले जाते.
वैद्यकीय शास्त्रानुसार, जर बोटे मोडल्याने वेदना होत नसतील, तर ते सहसा हानिकारक नसते.
जर वारंवार मोडल्याने वेदना, सूज किंवा कडकपणा येत असेल तर ते चिंतेचा विषय असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बोटे मोडल्याने एखाद्या व्यक्तीला थोड्या काळासाठी मानसिक आराम किंवा तणावापासून आराम मिळू शकतो, यामुळे बरेच लोक हे करतात, असे ही समोर आले आहे.
ही माहिती काही संस्थांच्या संशोधनावर आधारीत आहे, लोकमत याची पुष्टी करत नाही.