हिचं नागरिकत्वच रद्द करतो, ट्रम्प अभिनेत्रीवर भडकले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अभिनेत्रीचा इतका राग का आला?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॉक शो होस्ट आणि अभिनेत्री रोझी ओडॉनेल हिच्यावर भडकले. ट्रम्प यांनी थेट नागरिकत्व रद्द करण्याची धमकी दिली.

डोनाल्ड ट्रम्प भडकले, त्याचे कारण म्हणजे अभिनेत्री ओडॉनेलने एका मुद्द्यावरून ट्रम्प सरकारवर केलेली टीका.

४ जुलैला टेक्सॉसमध्ये पूर आला. त्याबद्दल दुःख व्यक्त करताना अभिनेत्री ऑडॉनेलने ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर बोट ठेवलं.

'टेक्सॉसमध्ये जे घडलं, ते भयावह आहे. जेव्हा राष्ट्रपती सतर्कता यंत्रणा आणि हवामान विभाग संपवतात तेव्हा असे परिणाम बघायला मिळू शकतात.'

अभिनेत्री रोझी ओडॉनेलच्या विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'रोझी ओडॉनेल आपल्या महान देशाच्या कल्याणाच्या बाजूने नाहीये.'

'तिचे नागरिकत्व परत घेण्याबद्दल मी खूप गांभीर्याने विचार करत आहे. ती माणुसकीसाठी धोकादायक आहे', असे ट्रम्प म्हणाले.

'जर आयर्लंडला तिला देशात ठेवायचे असेल, तर तिने तिथे राहावे. गॉड ब्लेस अमिरेका', अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या विधानावर संताप व्यक्त केला. 

Click Here