भीती वाटली, थंडी वाजली, भावुक झाल्यावर अंगावर काटा येण्याचा अनुभव घेतला पण हे नेमकं का होतं?
त्वचेवर छोटे - छोटे उठाव तयार होतात, जणू काटे आले आहेत. याला म्हणतात Piloerection किंवा Goosebumps.
हंसाच्या (goose) त्वचेवर पिसं काढल्यावर असे छोटे-छोटे बंप्स दिसतात, म्हणून त्याला Goosebumps म्हणतात.
जेव्हा आपण भीती, थंडी किंवा भावनिक उत्तेजना अनुभवतो, तेव्हा शरीर आपोआप hair follicles ला आकुंचन करायला लावते.
आपल्या प्रत्येक केसाच्या मुळाशी arrector pili muscle नावाची सूक्ष्म स्नायू असतात. हे स्नायू आकुंचन पावले की केस उभे राहतात.
जेव्हा शरीराला थंडी लागते तेव्हा केस उभे राहून शरीराभोवती हवेची पातळ थर तयार करतात, हा एक छोटासा उबदार कुशन असतो.
पूर्वी गूजबंप्समुळे केस फुलून मोठे दिसत, प्राण्यांना शत्रूपासून वाचायला मदत व्हायची. आज आपल्याकडे केस कमी आहेत, पण प्रतिक्रिया अजूनही आहे.
जेव्हा आपण एखादं सुंदर संगीत, प्रेरणादायी भाषण किंवा भयावह प्रसंग अनुभवतो तेव्हा डोपामिन आणि ऍड्रेनालिन हार्मोन्स सक्रिय होतात अंगावर काटा येताे.
अंगावर काटा येणं म्हणजे शरीरातल्या नैसर्गिक अलार्म सिस्टीमची खूण आहे. ते आपल्याला सांगत, तू जिवंत आहेस, तुझ्या भावना जिवंत आहेत.