जिराफाची मान इतकी लांब का असते?

जिराफा हा त्याच्या उंचीमुळे नेहमीच सगळ्या प्राण्यांपासून वेगळा उठून दिसताे. पण, जिराफाची मान इतकी लांब का असते, तुम्हाला माहिती आहे का?

जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राणी असून त्याची उंची १८ फूटापर्यंत वाढू शकते. 

जिराफाची उंची त्याच्या मानेमुळे अधिक वाढते. जिराफाची मान इतकी लांब असते, यामागे २ मुख्य कारणं आहेत.

जिराफाचे मुख्य अन्न झाडांची पानं हे आहे. उंच झाडावरील काेवळी पाने खाण्यासाठी जिराफाची मान इतकी उंच असते. 

तो बहुतांश वेळा Acacia झाडाची कोवळी पानं खातो. या पानांपर्यंत अन्य प्राण्यांना सहज पोहोचता येणे शक्य नसते. 

अन्य जिराफांची स्पर्धा करण्यासाठी ही जिराफ त्याच्या लांब मानेचा उपयाेग करताे. 

जिराफ स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी नर जिराफ necking नावाची लढाई करतात. त्यासाठी त्यांच्या लांब मानेचा वापर करतात. 

जिराफाची मान इतकी लांब असूनही त्यात फक्त ७ हाडं असतात. हे प्रत्येक हाड मात्र लांबलचक असतं. म्हणूनच त्याची मान इतकी विलक्षण दिसते. 

जिराफाची मान लांब असल्यामुळे त्याला दूर वरचे अगदी स्पष्ट दिसते. लांबून येणारा शत्रू त्याला सहज दिसताे, म्हणून ताे नेहमी सावध असताे. 

जिराफाच हृदय हे खूप शक्तीशाली असते. कारण, हृदयाला उंच लांब मानेतून डाेक्यापर्यंत रक्त पुरवठा करायचा असताे. 

जिराफाची जीभ जवळपास ४५ सेंमी लांब असते. उन्हामुळे खराब हाेऊ नये म्हणून ती निळसर - काळ्या रंगाची असते. 

जिराफाची लांब मान हे निर्सगाने त्याला दिलेले वरदान आहे. मान फक्त त्याची शाेभा नसून निसर्गात टिकून राहण्यासाठी उपयुक्त आहे. 

Click Here