पावत्या फाडणाऱ्या पोलिसांनाही माहिती नसेल...
तुम्ही रोज प्रवास करता, तुम्ही कधी विचार केला आहे का सिग्नलचा रंग लाल, पिवळा आणि हिरवा का असतो.
या तीनच रंगांमध्ये सिग्नल का असतो याचे कारण त्या सिग्नलवर सिग्नल मोडला म्हणून दंड करणाऱ्या पोलिसांनाही माहिती नसेल.
यामागे काही शास्त्रीय आणि मनोवैज्ञानिक कारणे आहेत. जी आज तुम्हाला जाणून घ्यायची आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे हे तिन्ही रंग लांबुनही लोकांना दिसतात. रंगांधळेपणा असेल तर फरक समजत नाही.
लाल रंगाची वेव्हलेंथ म्हणजे प्रकाश फेकण्याची क्षमता ही सर्वाधिक असते. म्हणून त्याला थांबण्यासाठी, धोक्याचे आहे हे सांगण्यासाठी निवडले गेले.
हिरवा रंगाची देखील वेव्हलेंथ जास्त आहे, परंतू निसर्गाचा रंग हिरवा असल्याने सुरक्षित वाटण्यासाठी हिरवा रंग निवडण्यात आला.
आणि पिवळा रंग देखील चांगली दृष्यमानता देतो, यामुळे तो इशारा म्हणून वापरण्यात आला आहे.
१८६८ मध्ये लंडनमध्ये पहिला गॅसवर चालणारा ट्रॅफिक लाईट बसवण्यात आला होता.
यामध्ये फक्त लाल आणि हिरवा रंग वापरण्यात आला होता. नंतर पिवळा रंग आला व जगभरात याचा प्रसार झाला.