देवळात आरती घेतल्यावर ताम्हनात पैसे टाकतात. ताम्हनात पैसे टाकणे ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. असे का करतात तुम्हाला माहिती आहे का?
आरती झाल्यानंतर सगळ्यांना आरती देण्याची पद्धत आहे. आरती घेतल्यावर ताम्हनात पैसे टाकतात, असे केल्याने काय हाेते, हे माहिती आहे का ?
ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही सुरू आहे. या प्रथेमागे नक्की कारण काय आहे, याची माहिती आज तुम्हाला देणार आहाेत.
आरती झाल्यावर सगळेजण आरती घेऊन देवाचा आशीर्वाद घेतला घेतात. आणि पैसे ताम्हनात टाकतात.
ताम्हनात पैसे टाकणे या मागचे कारण आहे दान. दान करणे शुभ आणि पुण्याचे काम मानले जाते. त्यामुळे ही प्रथा आजही सुरू आहे.
देवळातील पुजारी हे आपले संपूर्ण आयुष्य देवासाठी समर्पित करतात. त्यामुळे त्यांना दान करणे पुण्याचे मानले जाते.
आरतीच्या ताम्हनात पैसे टाकल्याने पुजाऱ्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही मुख्य भावना असते.
आरतीच्या ताम्हनात पैसे दान केल्याने सुख, समृद्धी मिळते, असे मानले जाते. लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहाते.