लष्करामध्ये नियम आणि शिस्त या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देशसेवेसाठी जवानांना अनेक कठीण प्रसंग, आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्यांना कठोर ट्रेनिंगही दिलं जातं.
लष्कराची शिस्त, जवानांचं शिस्तबद्ध वर्तन याविषयी प्रत्येकालाच कुतूहल आणि कौतुक असतं. यामध्येच लष्करातील जवानांची हेअर कट अनेकदा चर्चेचा विषय ठरते.
लष्करातील जवानांचा हेअरकट हा कायम बारीक असतो. एकाही जवानाचे केस कधीही वाढलेले किंवा स्टायलिश नसतात. परंतु, जवान कायम झिरो कट किंवा बारीक केस का कापतात माहितीये का?
लष्करी जवानांचे केस खासकरुन साईडच्या बाजूने आणि पाठीमागे मानेजवळ एकदम बारीक असतात. तर वरच्या बाजूचे केस किंचित मोठे असतात. हा हेअरकट साधा दिसत असला तरी तो करण्यामागे एक कारण आहे.
लष्कर म्हणजे साधेपणा, शिस्तबद्ध आणि कडक नियम यांचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळेच त्यांची हेअर स्टाइल मध्ये शिस्तीचं एक प्रतिक आहे.
सेनेतील सगळ्या जवानांचा हेअरकट एकच असणं म्हणजे एकात्मतेचंही ते प्रतिक मानलं जातं. येथे येणारा प्रत्येक जवान हा सारखा आहे. त्यांच्यात उच्च-निच्च असा कोणताही भेदभाव नाही हे यावरुन दर्शवलं जातं.
युद्धाप्रसंगी जर डोक्याला कुठे मार लागला तर त्या जखमेवर उपचार करणं सोपं जावं यासाठीही त्यांचा हेअर कट बारीक ठेवला जातो. कारण, मोठे केस असतील तर जखमेवर उपचार करण्यास अडथळा किंवा विलंब होऊ शकतो.
युद्धप्रसंगी लांब केसांचा डोळ्यांसमोर अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्यांचा हेअरकट हा बारीक ठेवला जातो.