पोळी भाजतांना फुगते का माहितीये?

आपल्याला वाटतं की पोळी छान लाटली किंवा भाजली की ती फुगते. परंतु, तसं अजिबात नाहीये. 

गरम-गरम तव्यावरची पोळी खायला सगळ्यांनाच आवडते. यातही काही जणांना टम्म फुगलेली पोळी विशेष आवडते.

अनेक स्त्रिया पोळी भाजतांना त्यांची पोळी छान टम्म फुगते. ज्यामुळे लोक त्यांचं कौतुकही करतात. परंतु, या पोळ्या का फुगतात माहितीये का?

आपल्याला वाटतं की पोळी छान लाटली किंवा भाजली की ती फुगते. परंतु, तसं अजिबात नाहीये. पोळी फुगण्यामागे एक वेगळंच कारण आहे.

पोळी फुगण्यामागे कार्बन डायऑक्साइड गॅस हे खरं कारण आहे. ज्यावेळी आपण कणिक मळून त्याचे गोळे तयार करतो. त्यावेळी त्यात प्रोटीन आणि ग्लुटेन तयार होतं.

ग्लुटेनचं एक वैशिष्ट्य आहे की तो, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. हिच ग्लूटेनयुक्त पोळी ज्यावेळी आपण भाजतो. त्यावेळी तिच्या आत गॅस तयार होतो. त्यामुळे ती फुगते.

पोळी तव्यावरुन काढल्यानंतर लगेच तिच्यातली हवा बाहेर पडते आणि ती खालती बसते. 

सोयाबीनमुळे दूर होईल कॅल्शिअमची कमतरता, जाणून घ्या फायदे

Click Here