भारतीयांना थायलंड फिरायला का आवडतं?

परदेशी फिरायला जाण्याची इच्छा असणारे अनेक भारतीय थायलंड या देशाला पसंती देतात.

दरवर्षी भारतातील लाखो लोक थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी आणि फिरण्यासाठी जातात.

थायलंड हा बजेट फ्रेंडली देश आहे. हा देश फिरण्यासाठी आणि इथली संस्कृती अनुभवण्यासाठी जवळपास ६० हजार रुपये पुरेसे आहेत.

४-५ दिवसांच्या या ट्रीपमध्ये तुमचे जाणे-येणे, विमान प्रवास, हॉटेल, खाणे आणि थायलंडमधील विविध ठिकाणे पाहणे या सगळ्या गोष्टी करू शकता.

महत्त्वाचे म्हणजे भारतीयांसाठी या देशाचा व्हिसा अगदी मोफत आहे. या देशात व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध आहे. 

भारतीय पर्यटक थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावर व्हिसा मिळवू शकतात, जो ३० दिवसांसाठी वैध असतो. 

बँकॉक आणि पटाया येथील नाईटलाइफ जगभरात प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मध्यमवर्गीयांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांना परवडणारे आहे.

बॅचलरेट पार्टी असो, मित्रांसोबत ग्रुप ट्रिप असो किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत गेटअवे असो हे ठिकाण पार्टी प्रेमींसाठी स्वर्ग आहे.

थायलंड शॉपिंग प्रेमींसाठी स्वर्ग आहे. चाटूचाक मार्केट, एमबीके मॉल, फ्लोटिंग मार्केट आणि लोकल स्ट्रीटवर भरपूर खरेदी करता येते. 

या शिवाय थायलंडमधील प्रसिद्ध आयलंड्सवर  वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स आणि समुद्राखालची दुनिया अनुभवता येते. 

थायलंडच्या स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहणे हा खरोखरच एक अनोखा अनुभव आहे.

Click Here