समवयस्क तरुणांऐवजी या तरुणी विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात?
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं-आमचं सेम असतं', असं सहज म्हटलं जातं. परंतु, गेल्या काही काळात प्रेमाची व्याख्या बदलली आहे.
अनेक तरुणी चक्क विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडत आहेत. परंतु, समवयस्क तरुणांऐवजी या तरुणी विवाहित पुरुषांच्या प्रेमात का पडतात याची कारणं रिलेशनशीप एक्सपर्ट डॉ. कशिका जैन यांनी सांगितली आहेत.
बऱ्याचदा मुली गैरसमजातून प्रेमात पडतात. एखाद्या विवाहित पुरुषाने आपुलकीने चौकशी केली, काळजी घेतली तर त्याला मुली प्रेम समजतात. आणि,त्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडतात.
विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणाऱ्या मुली त्यांचा आत्मसन्मानही सोडायला तयार होतात. एका पुरुषाचं प्रेम मिळवण्यासाठी त्या अनेक तडजोडी करायला तयार होतात.
लग्न झालेला पुरुष घर,संसार नीट सांभाळतोय हे पाहून मुली इंप्रेस होतात. व तो परफेक्ट पार्टनर असल्याचं मानून त्याच्या प्रेमात पडतात.
एकतर्फी प्रेमात पडलेल्या मुली सत्य परिस्थिती स्वीकारत नाहीत. एक ना एक दिवस विवाहित पुरुष आपल्या प्रेमात पडेल या आशेवर त्या राहतात. आणि, यामुळे स्वत:ची मानसिक स्थिती बिघडवून घेतात.