डॉक्टर पांढऱ्या रंगाचाच कोट का घालतात?

डॉक्टर कायम या एकाच रंगाचा कोट का घालतात याचा कधी विचार केलाय का? 

आपण कोणत्याही हॉस्पिटल किंवा दवाखान्यात गेलो की तेथील नर्स, डॉक्टर वा कर्मचारी कायम आपल्याला पांढरा कोट किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्येच दिसतात.

ऑपरेशनच्या वेळीदेखील डॉक्टर पांढऱ्याच रंगाचा कोट घालतात. मात्र, डॉक्टर कायम या एकाच रंगाचा कोट का घालतात याचा कधी विचार केलाय का? चला तर मग त्यामागचं कारण समजून घेऊ.

पांढरा रंग स्वच्छता, पवित्रता आणि निष्कलंकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे डॉक्टरांकडे पाहिल्यावर रुग्णाला त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो.

पांढऱ्या कोटवर रक्ताचा थेंब, घाण किंवा डाग पडला की लगेच दिसतो. यामुळे डॉक्टरांना दररोज कोट स्वच्छ ठेवण्याची सक्तीच होते आणि स्वच्छतेची सवय कायम राहते.

हॉस्पिटलमध्ये दररोज अनेक माणसांची, कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. या गर्दीत पांढऱ्या कोटामुळे डॉक्टर ओळखू येतात. व, रुग्ण त्यांच्याकडे गरज पडल्यास मदत मागू शकतो.

पांढरे कापड ९० डिग्रीपर्यंत उकळून, ब्लीच लावून निर्जंतुक करता येते. त्यामुळे जीवाणू, व्हायरस नष्ट होतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

संशोधन सांगते की पांढरा कोट पाहून रुग्णांचा रक्तदाब कमी होतो, भीती कमी होते आणि डॉक्टरांवर विश्वास वाढतो. याला "White Coat Effect" म्हणतात.

असे लोक स्वतःच स्वतःचं घर उद्ध्वस्त करून घेतात...! काय सांगतात आचार्य चाणक्य ...?

Click Here