विराट कोहलीच्या पोस्टमधील #269 चा अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर
भारती संघाचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटर विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमुळे चर्चेत आहे.
कोहली कसोटीतून निवृत्त होण्यामागचं कारण काय? यासह त्याने पोस्टमध्ये #269 हा उल्लेख का केला? असा प्रश्नही काही क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
इथं जाणून घेऊयात कोहलीच्या रिटायरमेंट पोस्टमधील हॅशटॅग २६९ मागची खास स्टोरी
३६ वर्षीय विराट कोहलीनं २०११ मध्ये वेस्ट इडिंज विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते.
कोहली हा भारताकडून कसोटी खेळणारा २६९ वा खेळाडू आहे. टेस्ट कॅपचा हा खास नंबर हॅशटॅग करत त्याने निवृत्तीची घोषणा केल्याचे पाहायला मिळाले.
विराट कोहलीनं कसोटी आधी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार तो ३१ वा खेळाडू आहे.
२००८ मध्ये भारतीय संघाकडून त्याने वनडेत पदार्पण केले होते. या क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार तो १७५ वा खेळाडू आहे.