दररोज आपण रस्त्यावर असंख्य वाहने धावताना पाहतो. यात अशी काही ठराविक वाहनं असतात जी आपण त्यांच्या रंगावरुन किंवा आकारावरुन सहज ओळखतो.
रुग्णवाहिका, बस, स्कूल व्हॅन/ बस ही वाहन आपण त्यांच्या रंगावरुन ओळखू शकतो. परंतु, या वाहनांना ठराविक रंगच का दिला जातो? याचा कधी विचार केलाय का?
साधारणपणे प्रत्येक शाळेच्या स्कूल बसला पिवळाच रंग दिला जातो. परंतु, या बससाठी पिवळ्याच रंगाची निवड का केली जाते? हे समजून घेऊयात.
स्कूल व्हॅन किंवा बसला ठराविक रंग देण्यामागे एक खास कारण आहे. पिवळा रंग हा सहज दृष्टीस पडतो आणि लोकांचं लक्ष वेधून घेतो.
संध्याकाळची वेळ असतो वा पहाटेचा मंद प्रकाश या दोन्ही प्रकाशांमध्ये पिवळा रंग लगेच दिसून येतो. त्यामुळे लांबून जरी एखादी स्कूल व्हॅन येत असेल तर लगेच ते आपल्या लक्षात येतं.
आपल्या डोळ्यांना इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग १.२४ पटीने जास्त आकर्षित होतो. त्यामुळे आपलं लक्ष नसेल तरीदेखील हा रंग आपलं लक्ष वेधून घेतो.