याचा कधी विचार केलाय का... याची दोन कारणे आहेत...
तुम्ही आकाशात सकाळी किंवा सायंकाळी पक्षांचे थवेच्या थवे उडताना पाहता.
ते नेहमी व्ही शेपमध्येच उडत असतात. एक पक्षी पुढे आणि त्याच्या दोन्ही बाजुला दुसरे पक्षी एकामागोमाग एक असे...
पण याचा कधी विचार केलाय का... याची दोन कारणे आहेत...
V आकारात उडल्याने पक्षी एकमेकांवर आदळत नाहीत. हे पहिले कारण...
दुसरे म्हणजे पुढील पक्षी ज्यावेळी पंख मारतो तेव्हा हवेचा झोत तयार होतो. त्यामुळे मागच्या पक्षाला कमी मेहनत लागते.
पहिला जो पक्षी असतो तो हे निर्माण करतो, ज्याचा वापर दोन्ही बाजुचा दुसरा, तिसरा पक्षी करतो आणि पुढे जात राहतो.
आता हा जो पहिला पक्षी असतो तो त्यांचा नेता असतो. जो पहिला उडतो तो त्या उड्डाणावेळचा नेता असतो.
तो दमला की दुसरा पक्षी त्याची जागा घेतो आणि पहिला पक्षी मागे जातो. तो मग एअर लिफ्टचा वापर करतो व कमी कष्ट घेतो.