झोपताना तोंडाला चिकटपट्टी का लावतात लोक?

सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवा ट्रेंड, तज्ज्ञ म्हणतात...

सोशल मीडियावर रोज नवनवीन ट्रेंड येत असतात. असाच एक झोपताना तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. 

चांगली झोप लागणे आणि लोकांना नाकाने श्वास घेण्यास प्रेरित करणं हा यामागचा उद्देश आहे. 

तोंडाला चिकटपट्टी लावल्याने चांगली झोप, ओरल हेल्थ आणि अँटी एजिंगसाठी फायदा होत असल्याचा दावा केला जात आहे. 

तज्ज्ञांनी झोपताना तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा ट्रेंड खतरनाक असल्याचं म्हटलं आहे. 

ज्या लोकांना नाकाने श्वास घेण्यास त्रास होतो अशा लोकांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. 

सोशल मीडियावर हटके ट्रेंड व्हायरल होत असले तरी आरोग्याची नीट काळजी घ्या. असं काही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Click Here