तुम्हाला या मागचे कारण माहितीये का?
जेव्हा आपण बाहेर कुठे तरी फिरायला जायचा विचार करतो आणि आपल्याकडे वेळही अगदी कमी असतो, तेव्हा प्रवासासाठी विमान हा पर्याय उत्तम ठरतो.
अशावेळी आपण विमानातून प्रवास करत असताना एक गोष्ट लक्षात येते की, विमानातील सीट्सचा रंग निळा असतो. तुम्हाला या मागचे कारण माहितीये का?
निळा रंग हा विश्वासाहर्ता आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे, तो एयरोफोबिया असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे.
विमानांमध्ये निळ्या रंगाच्या आसने अनेक वर्षांपासून वापरली जात आहेत, कारण त्या आराम आणि विश्रांतीची भावना देतात.
काही विमान कंपन्या आधी विमानात लाल रंगाच्या सीट्स वापरायचे. मात्र आता बहुतेक विमान कंपन्या सीट्स निळ्या रंगाच्या ठेवतात.
या सीट्स निळ्या रंगाच्या असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, हा रंग गडद असतो, ज्यामुळे धूळ, डाग कमी दिसतात.
अनेक संस्कृतींमध्ये निळ्या रंगाचे आसन सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी संबंधित आहेत.
सगळ्याच विमानांमध्ये सीट्स निळ्या नाहीत, काहींमध्ये लाल, राखाडी, तपकिरी आणि चॉकलेटी रंगाच्या असतात.