भारतात पासपाेर्टचा रंग निळा का?

प्रत्येक देशातील पासपाेर्टचा रंग हा वेगळा असताे. सामान्य नागरिकांसाठी भारतात निळ्या रंगाचा पासपाेर्ट असताे. पांढरा आणि मरून रंगाचाही पासपाेर्ट असताे. पण... का?

परदेशात जाण्यासाठी पासपाेर्ट लागताे. प्रवास करताना तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का, आपल्याकडे असणारा पासपाेर्ट निळ्या रंगाचा का असताे?

प्रत्येक देश पासपाेर्टचा रंग ठरवताना, तिथली संस्कृती, परंपरा, नीति आणि देशाची ओळख या गाेष्टींचा विचार करून रंग निश्चित करण्यात येताे. 

भारतात ३ रंगांचे पासपाेर्ट आहेत. सामान्य नागरिकांसाठी निळ्या रंग. सरकारी अधिकाऱ्यांसाठी पांढरा तर डिप्लाेमॅटसाठी मरून रंगाचा पासपाेर्ट असताे. 

जगभरात सामान्य नागरिकांच्या पासपाेर्टसाठी निळा रंग प्रमाण मानला जाताे. निळा रंग हा व्यवहार्य आणि औपचारिक मानला जाताे. 

भारताशिवाय निळा पासपाेर्ट अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि ब्राझिल या देशांमध्येही वापरला जाताे. 

काही देशांत वेगळ्या रंगांचे पासपाेर्ट असतात. युराेपातील काही देशांत लाल रंगाचे, आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये काळ्या रंगाचे पासपाेर्ट असतात. 

पासपाेर्टवर २२ भाषांमध्ये 'भारत गणराज्य' आणि 'पासपाेर्ट' असं लिहीलेलं असतं. हिंदी आणि इंग्लिशशिवाय अन्य २० भारतीय भाषांचा समावेश यात आहे. 

Click Here