तुम्हाला माहिती आहे का की, महात्मा गांधींच्या आधी भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असायचा?
भारताचे चलन रुपया आहे, ज्यामध्ये प्रत्येक नोटेवर महात्मा गांधींचे चित्र छापलेले आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का की, महात्मा गांधींच्या आधी भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असायचा?
जर, तुम्हाला माहित नसेल, तर आज जाणून घेऊया की ती व्यक्ती कोण होती, ज्यांचा फोटो भारतीय नोटांवर असायचा.
महात्मा गांधींपूर्वी, भारतीय चलनी नोटांवर ग्रेट ब्रिटनचे राजा जॉर्ज सहावे यांचा फोटो असायचा.
भारत स्वतंत्र झाल्यावर, चलनी नोटांमधून राजा जॉर्ज यांचा फोटो काढून त्यावर अशोक स्तंभाचे चित्र लावण्यात आले होते.
१९५० मध्ये, भारत सरकारने देशाचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाचे चित्र चलनी नोटांवर छापण्यास सुरुवात केली.
१९६९ मध्ये, महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त पहिल्यांदाच भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.
१९९६ मध्ये, आरबीआयने सर्व चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यास सुरुवात केली.