तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही का...
कोणतीही नवीन कार खरेदी करण्यापूर्वी आपण सारेच त्या कारची टेस्ट ड्राईव्ह घेतो.
मुळात टेस्ट ड्राईव्ह ही मोठी शंकाच आहे. कारण २-४ किमीमध्ये ती कार कशी आहे हे कसे कळेल?
परंतू, तरीही आपण ती चालवून पाहतो. तिचा पिकअप कसा आहे, किती फास्ट जाते वगैरे वगैरे...
अशावेळी अनेकदा चालक हा नुकताच शिकाऊ देखील असतो. तुमच्या आधीच्या कारपेक्षा ती कार थोडी मोठी, लांब पण असू शकते.
यामुळे मागे-पुढे घेताना किंवा नशीब वाईटच असेल तर रस्त्यातच अपघात होतो.
कारची टेस्ट ड्राईव्ह ही प्रामुख्याने रहदारीच्या रस्त्यांवरच घेतली जाते. यामुळे अपघाताचा धोका असतो.
जर समजा तुमच्या हातून या टेस्ट ड्राईव्ह कारचा अपघात झाला, तर नुकसान भरपाई कोणाला करावी लागते.
तुम्ही तर ग्राहक असता, तुमच्या हातून गाडी ठोकली गेली तर तुम्हाला पैसे द्यायचेत की त्या कार कंपनीला...
कोणतीही टेस्ट ड्राईव्ह कार मग ती रजिस्टर असो की टेम्पररी रजिस्टर, त्यांचा इन्शुरन्स काढलेला असतो.
यामुळे तुम्ही जर ती कार ठोकली तर त्या कारची भरपाई ही कंपनी करते, त्यांनी काढलेल्या इन्शुरन्समधून.
फक्त तुम्ही जर ठोकली असेल तर तुमच्याकडे वैध लायसन असणे गरजेचे असते.
जर काही पोलीस केस झाली तर मात्र त्याची जबाबदारी तुमच्यावरही असते. यामुळे जरा जपूनच टेस्ट ड्राईव्ह घ्यावी.