विराटमुळे ती स्पोर्ट्स मसाज थेरेपिस्ट पुन्हा चर्चेत, कारण...

 RCB च्या खेळाडूंना फिट ठेवणारी ती 

शंभर टक्के फिट नसल्यामुळे पहिल्यांदाच विराट कोहली इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरला.

कोहलीनं RCB च्या ट्रेनिंग सेशनमध्ये आपल्या ताफ्यातील महिला स्पोर्ट्स मसाज थेरिपिस्टकडून मसाज करून घेतल्याचा फोटो सध्याव्हायरल होत आहे. 

इथं जाणून घेऊयात IPL मधील पहिल्या महिला स्पोर्ट्स मसाज थेरेपिस्टसंदर्भातील खास गोष्ट

२०१९ पासून नवनीता गौतम RCB च्या संघासोबत स्पोर्ट्स मसाज थेरेपिस्टच्या रुपात काम करत आहे. 

RCB पुरुष संघातील कोहलीपासून ते महिला संघातील स्मृती मानधनापर्यंत स्टार खेळाडूंना मैदानात उतरण्यासाठी फिट ठेवण्याची जबाबदारी ती सांभाळते. 

कॅनडा येथील वैंकूवर येथे जन्मलेली नवनीता गौतम ही एक  सर्टिफाइड ॲथलेटिक थेरेपिस्ट आहे. IPL आधी तिने आंतरारष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातील संघासोबत काम केले आहे. 

विराट कोहलीसह RCB च्या संघातील खेळाडूंना नवनीता विशेष मॅन्युअली थेरेपी आणि सॉफ्ट टिश्य टेक्निकच्या माध्यमातून फिट ठेवण्याचं काम करते. 

Click Here