गुगल केलात तर तुम्हाला सुंदर पिचईच दिसतील, पण... दोन व्यक्ती सर्वात शक्तीशाली...
इंटरनेटच्या मायाजालात काहीही शोधायचे झाले की आपली बोटे सर्वात आधी गुगल टाईप करतात.
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या या गुगलचा खरा मालक कोण? तुम्हाला कधी प्रश्न पडला नसेल का...
गुगल सर्वांना फेमस करते, कोणाला पुढे आणायचे, कोणाला मागे ठेवायचे, जाहिराती किती दाखवायच्या आदींवर प्रचंड नियंत्रण आहे.
याच गुगलने आपले खरे मालक मात्र जगापासून लपवून ठेवले आहेत. सुंदर पिचई तर फक्त सीईओ आहेत परंतू तुम्ही जर सर्च केले तर तेच गुगलचे मालक दिसतील.
गुगलची मालकी अल्फाबेट कंपनीक़डे आहे खरी परंतू ही कंपनीच मुळात २०१५ मध्ये स्थापन झाली होती.
गुगलच्या अन्य प्रॉडक्टची मालकी अल्फाबेटकडेच आहे, परंतू या अल्फाबेटची मालकी दोन अशा व्यक्तींकडे आहे जे गुगलमध्ये सर्वाधिक शक्तिशाली आहेत.
लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी १९९८ मध्ये गुगलची स्थापना केली होती. हेच दोघे गुगलचे सर्वात शक्तीशाली मालक आहेत.
दोघेही आता गुगलमध्ये सक्रीय नसले तरीही त्यांच्याकडे अशी ताकद आहे जी त्यांना सर्वाधिक मतदानाचे अधिकार प्रदान करते.
गुगलच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा या दोघांच्या कुटुंबाला जातो. जो जाहिरातीतून येतो.
गुगल दर सेकंदाला ९९ हजार क्वेरींवर काम करते.