देशात वेगवेगळ्या रंगाचे पासपोर्ट जारी केले जातात. मात्र व्हाईट पासपोर्टचं महत्त्व खूप आहे.
परदेशात प्रवास करणाऱ्या प्रत्येक भारतीयाकडे पासपोर्ट असणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे भारतात अनेक प्रकारचे पासपोर्ट आहेत.
भारतात ब्ल्यू, व्हाईट, ऑरेंज आणि मरून रंगाचा पासपोर्ट जारी होतात. मरून पासपोर्टला डिप्लोमेटिक पासपोर्टही म्हटलं जाते.
ब्ल्यू पासपोर्ट हा सर्वसामान्य नागरिकांसाठी जारी होतो. ऑरेंज पासपोर्ट अशा भारतीयांसाठी आहे ज्यांचे शिक्षण १० वी पर्यंत झालं आहे
भारतात व्हाईट पासपोर्ट हे उच्च सरकारी अधिकारी जसे IAS, IPS आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंधित व्यक्तींना जारी केले जाते
व्हाईट पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रियाही वेगळी असते. त्याशिवाय पांढऱ्या रंगाच्या पासपोर्ट धारकांना काही विशेषाधिकारही मिळतात.
मुख्य वैशिष्ट म्हणजे व्हाईट पासपोर्ट आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार विशेष पास आहे, ज्यामुळे या धारकांना काही देशांमध्ये फ्री व्हिसा मिळतो.
त्याशिवाय हा पासपोर्ट फक्त अधिकृत सरकारी कामकाजासाठी वापरता येतो, वैयक्तिक किंवा पर्यटन प्रवासासाठी नाही. याची वैधता सामान्यतः १ ते ५ वर्षे असते