नियमीत कानाची काळजी घेता? तर हे वाचा 

कान साफ करण्यासाठी या गोष्टी वापरता, नियमितपणे कान साफ करता, तर तुम्हालाही हा धोका आहे. 

डोळे, नाक याबरोबरीनेच कान हा देखील महत्त्वाचा नाजूक अवयव आहे. कानाची स्वच्छता करताना या गोष्टी करणे टाळले पाहिजे. 

कानात असलेला मळ चांगला नाही म्हणून काढून टाकून कान स्वच्छ केला जातो. 

कानातला मळ म्हणजे वॅक्स हे कानाला इजा होऊ नये म्हणून संरक्षण कवच असते. 

काडेपेटीच्या काड्या, टोकदार वस्तूंचा वापर करून कानात आतमध्ये असलेला मळ काढला जातो. हे चुकीचे आहे. 

बड्स किंवा तेल घालून कानातला मळ काढत असताना कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. 

कानाच्या पडद्याला इजा झाली, पडदा फाटला तर ऐकू येणे बंद होऊ शकते. 

कानात जास्त प्रमाणत मळ येत असेल तर डॉक्टरकडे जावे, त्यांचा सल्ला घ्यावा. 

कानात खाज येत असेल, कान दुखायला लागला तर डॉक्टरांकडून कानाची तपासणी करून घ्यावी. 

Click Here