फ्लेवर पाहून टूथपेस्ट खरेदी करता? मग आताच थांबा!

टूथपेस्ट विकत घेतांना घ्या 'ही' काळजी

आजकाल बाजारात टूथपेस्टचे अनेक विविध ब्रँड पाहायला मिळतात. इतकंच नाही तर या टूथपेस्ट वेगवेगळ्या फ्लेवर्समध्येही उपलब्ध आहेत.

प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार टूथपेस्टची निवड करत असतो. परंतु, टूथपेस्ट खरेदी करतांना त्याच्या फ्लेवर महत्त्वाचा नसतो. म्हणूनच टूथपेस्ट खरेदी करतांना कोणत्या गोष्टी विचारात घ्याच्या ते पाहू.

टूथपेस्ट खरेदी करतांना त्याचा ब्रँड किंवा फ्लेवर न पाहता त्या पेस्टमध्ये फ्लोराईडचं प्रमाण किती आहे हे पाहिलं पाहिजे.

दातांच्या आरोग्यासाठी फ्लोराईडयुक्त पेस्ट वापरण्याचा सल्ला डेंटीस्ट खालीद कासिम यांनी दिला आहे. कारण फ्लोराईडसमुळे दात व्यवस्थित स्वच्छ केले जातात.

लहान मुलांसाठी जर तुम्ही टूथपेस्ट खरेदी करत असाल तर त्यांच्यासाठी फ्लोराईडचं प्रमाण कमी असलेली पेस्ट घ्या.

मुलांचे दात नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी कमी फ्लोराईडची पेस्ट घ्या. लहान मुलांसाठी १००० ppm फ्लोराईड असलेली पेस्ट खरेदी करावी.

'गाय' कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?

Click Here