आजवर अनेकांनी जगात घडणाऱ्या गोष्टींची भविष्यवाणी केली आहे.
जगभरात भविष्यवाणी करणाऱ्या व्यक्तींची कमी नाही. आजवर अनेकांनी जगात घडणाऱ्या गोष्टींची भविष्यवाणी केली आहे. यात काहींची खरी ठरली तर काहींची खोटी.
बाबा वेंगा तर सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यांनी केलेल्या बऱ्याच भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. परंतु, त्याच्याप्रमाणेच असे काही बाबा आहेत ज्यांनी भविष्यवाणी केली आहे.
१६ व्या शतकात फ्रान्समध्ये नास्रेदमस यांचा जन्म झाला होता. त्यांनी लिहिलेलं Les Prophéties हे पुस्तक आजही बेस्टसेलर म्हणून ओळखलं जातं. नास्त्रेदमस हे संकेत, कोड्यांच्या माध्यमातून भविष्यवाणी करायचे.
बाबा वेंगा दृष्टीहीन असूनही त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.दहशतवादी हल्ला, राजकीय घडामोडी, नैसर्गिक आपत्ती यांविषयी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.
जपानचे रयो तत्सुकी यांना स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात. त्सुनामी, भूकंप, राजकीय संकट यांविषयी त्यांनी केलेले दावे चर्चेत आले आहेत.
अमेरिकेतील एडगर केसी हे चिरनिद्रेत जाऊन भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. आजवर त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या काहीअंशी खऱ्या ठरल्या आहेत.
जगातील सर्वात निडर प्राणी! साप, विंचवाच्या विषाचाही होत नाही त्याच्यावर परिणाम