एकीकडे 'एआय' अनेकांच्या नोकऱ्या खात असताना दुसरीकडे येत्या पाच वर्षात काही प्रकारच्या नोकऱ्या आणि जॉब्सना मात्र सुगीचे दिवस येणार आहेत.
बिग डेटा स्पेशालिस्ट्स, फिनटेक इंजिनिअर्स आणि एआय तसंच मशीन लर्निंग स्पेशालिस्ट्स यांच्यासाठीची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
बिग डेटा स्पेशालिस्ट्सची मागणी तर ११० टक्क्यांनी वाढणार आहे. त्याखालोखाल एआय तसंच मशीन लर्निंग स्पेशालिस्ट्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचीही मोठी चलती असणार.
त्यामुळे भविष्यात नोकरी मिळवायची किंवा टिकवायची, तर त्यासाठी आपल्यात काही कौशल्यं हवीत.
यासाठी जगभरातील कंपन्या प्राधान्य देत ते अॅनालिटिकल थिंकिंग, लवचीकता आणि नेतृत्वगुणांना. अनुक्रमे ६९ टक्के, ६७ टक्के आणि ६१ टक्के कंपन्यांना कर्मचाऱ्यांमध्ये ही कौशल्यं हवीत.