भारतातील 'या' काही अद्भुत गोष्टींची माहिती तुम्हाला असायलाच हवी!
भारत हा एक सुंदर देश आहे, जो इथल्या कला, सभ्यता, संस्कृती आणि इतिहासासाठी ओळखला जातो.
भारतात अशी अनेक शहरे आणि गावे आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पण, तुम्हाला भारतातील शेवटचे आणि पहिले शहर कोणते आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
भारतातील ब्रिटीश राजवटीत उत्खननादरम्यान 'हडप्पा'कालीन गाव सापडले होते. त्यामुळे ही सगळ्यात जुनी संस्कृती मानली जाते.
भारतातील सर्वात जुने शहर काशी आहे, जे शिवपुरी म्हणूनही ओळखले जाते. वेद आणि पुराणांमध्येही याचा उल्लेख आहे.
कन्याकुमारी हे भारतातील शेवटचे शहर मानले जाते. येथे असलेल्या धनुषकोडीला शेवटचा रस्ता म्हणतात.
उत्तराखंडमधील माना गाव हे शेवटचे गाव मानले जाते. हे गाव खूप सुंदर आहे. लोक येथे फिरायला जातात.
भारतातील शेवटचे दुकान देखील अस्तित्वात आहे आणि त्याचे नाव 'हिंदुस्तान की अंतीम दुकान' आहे, जे चमोली जिल्ह्यात आहे.
भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन हबीबपूर परिसरात स्थित 'सिंघाबाद' आहे. ते सर्वात जुने आणि शेवटचे रेल्वे स्टेशन आहे.
कॉमिक हे देशातील सर्वात उंच गाव आहे. ते स्पिती व्हॅलीमध्ये वसलेले आहे. येथे वाहनांसाठी खास रस्ता बनवण्यात आला आहे.