ओला, उबर की रॅपिडो सगळ्यात स्वस्त सेवा कोण देत?

साधारणपणे ओला आणि उबरचे दर हे नॉन पिक अवर्समध्ये स्वस्त वाटतात. 

प्रवाशांसाठी कॅब बुकिंगची सेवा देणाऱ्या ओला, उबरच्या टॅक्सी, रिक्षा आज सर्रास रस्त्यावर धावतांना दिसतात.

ओला, उबर पाठोपाठच आता रॅपिड आणि भारत टॅक्सी या नवीन कॅब सुविधादेखील सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे या चारही कॅब सेवेचा वापर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो.

ओला, उबर, रॅपिडो आणि भारत टॅक्सी या चौघांपैकी सर्वात स्वस्त सुविधा कोणती कंपनी देते हे तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊयात. 

ओला आणि उबरचे दर हे नॉन पिक अवर्समध्ये स्वस्त वाटतात. परंतु, त्यांचे प्रति किलोमीटर दर हे शहर,ट्रॅफिक आणि गाडीचा प्रकार यांवर अवलंबून असतात. त्यामुळे हे दर प्रतिकिलोमीटर १२ ते २० रुपये इतके असतात.

ओला, उबरचे हेच दर ऑफिस अवर्स, ट्रॅफिक जाम, विकेंड, खराब हवामान या काळात दुपटीने वाढतात. या दोन्ही कंपन्यांच्या तुलनेत मात्र भारत टॅक्सीचे दर हे २० ते ३० टक्क्यांनी कमी असतात.

हीच परिस्थिती रॅपिडोच्या बाबतीत एकदम उलट आहे. जर तुम्ही रॅपिडो बाईकने प्रवास करत असाल तर तो सगळ्यात स्वस्त ऑप्शन मानला जातो. 

जर तुम्हाला पिक अवर्समध्ये प्रवास करायचा असेल तर ओला, उबरपेक्षा भारत टॅक्सी आणि रॅपिडो हा बेस्ट पर्याय आहे. यांचे दर हे ओला, उबरच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी आहेत.

तुमच्या घराखाली तेलाची विहीर तर नाही ना? कसा लावला जातो शोध

Click Here