सलमान खानला झालेला ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया आजार कशामुळे होतो?

हा आजार औषधोपचाराने बरा होतो की, शस्त्रक्रिया करावी लागते?

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने नुकत्याच एका वाहिनीवरील शोमध्ये ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया या आजाराने त्रस्त असल्याचे जाहीर केले.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया हा एक चेहऱ्यावर तीव्र वेदना देणारा विकार आहे. या आजाराला ‘सुसाइड डिसीज’ असेही म्हटले जाते.

हा आजार तीव्र वेदना देणारा असतो. सुटका व्हावी म्हणून रुग्णांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. आजारामुळे रुग्णाचे कपाळ, जबडा, गालावर इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखे वाटते.

रुग्णाच्या ट्रायजेमिनल नर्व्हला नुकसान होते किंवा त्यावर दाब येतो, त्यावेळी अशा प्रकारच्या असह्य वेदना होतात. हा आजार शक्यतो तिशी-चाळिशीनंतर होत असल्याचे दिसून आले.

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया आजार होण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. त्यामध्ये मेंदूमध्ये मोठी गाठ झाल्यास आणि मल्टिपल स्केलोसिस हा आजार झाल्यावर हा आजार जडतो.

२०११ साली या आजारामुळे अभिनेता सलमान खान याला आजाराच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती. 

आजाराच्या निदानासाठी मेंदूचा एमआरआय करावा लागतो. सलमानने एका शोमध्ये, ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियासह अनेक आरोग्य समस्यांशी झुंजत असल्याचेही सांगितले.

त्याला ब्रेन ॲन्यूरिझ्म (मेंदूतल्या रक्तवाहिनीत अडथळा), आर्टेरिओव्हेनस मालफॉर्मेशन (रक्तप्रवाहाचे असंतुलन, रक्तस्रोव होण्याची शक्यता, मेंदूवर अतिरिक्त ताण) हे आजार आहेत.

या आजारावर औषधोपचाराने नियंत्रण मिळविता येते. ज्या रुग्णांना औषधांनी बरे वाटत नाही, त्यांना मेंदूची शस्त्रक्रियासुद्धा करावी लागते.

चेहऱ्यावरील मेंदूकडे जाणाऱ्या नसेमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हा आजार होतो. लोकल नर्व्ह ब्लॉक देऊन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो, असे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. निर्मल सूर्या यांनी सांगितले. 

Click Here