कोणत्या देशाकडे आहेत सर्वाधिक अण्वस्त्रे?

रशिया, चीन की अमेरिका, कोणत्या देशाकडे सगळ्यात जास्त अण्वस्त्रे आहेत, जाणून घेऊया... 

भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान सध्या अण्वस्त्रांचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

युनियन ऑफ कंसर्न्ड सायंटिस्टच्या मते, सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, भारत, इस्रायल,आणि उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत.

सध्या अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया आघाडीवर आहे. रशियाकडे एकूण ६००० अण्वस्त्रे आहेत.

रशियानंतर अमेरिकेकडे सर्वाधिक म्हणजेच ५४०० अण्वस्त्रे आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनकडे सध्या ५०० अण्वस्त्रे आहेत.

अण्वस्त्रांमध्ये चौथ्या स्थानावर फ्रान्स आहे. फ्रान्सकडे २९० अण्वस्त्रे आहेत.

युनियन ऑफ कंसर्न्ड सायंटिस्टच्या रिपोर्टनुसार, १२० अण्वस्त्रांसह ब्रिटन पाचव्या स्थानावर आहे.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्र असलेल्या देशांच्या यादीत असून, भारताकडे १६० तर पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत.

Click Here