परकीय चलन मिळवण्यासाठी 'पर्यटन' हा हुकमी एक्का आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार पर्यटनाचाच असतो.
पर्यटनाच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा देश आहे अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन.
२०२४मध्ये अमेरिकेनं पर्यटनाच्या माध्यमातून तब्बल २.४ ट्रिलियन डॉलर्स, तर चीननं १.३ ट्रिलियन डॉलर्सची कमाई केली.
मात्र पुढील दशकात चीन पहिल्या, तर भारत चौथ्या क्रमांकावर येईल, असा अभ्यासकांचा दावा आहे.
पर्यटनातून पैसे कमावण्याच्या भारताच्या क्रमवारीतील स्थानाबद्दल बोलायचं झालं, तर भारत आहे, आठव्या क्रमांकावर.
वर्ल्ड ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम काउन्सिल आणि व्हिज्युअल कॅपिटालिस्टच्या रिपोर्टनुसार भारताने पर्यटन क्षेत्रातून २३२ अब्ज डॉलर्स इतकी कमाई केली आहे.
टॉप टेन देशांच्या यादीत सर्वात खाली म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे, स्पेन. रिपोर्टनुसार स्पेनने पर्यटनाच्या माध्यमातून २०२४ मध्ये २२८ अब्ज डॉलर्स कमाई केली आहे.